Ad will apear here
Next
ऑस्ट्रेलियन तरुणाईला कोकणच्या खाद्यसंस्कृतीची भुरळ!
कुडाळ : कोकणातील, विशेषतः मालवणी खाद्यसंस्कृतीने ऑस्ट्रेलियन तरुणाईला भुरळ घातली आहे. फास्ट फूडपेक्षा येथील खाद्यपदार्थ चविष्ट आणि आरोग्याला चांगले आहेत, असे मत कोकणात अभ्यासदौऱ्यावर आलेल्या तरुण विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलिया येथून १३ विद्यार्थी व विद्यार्थिनी कुडाळ तालुक्यातील निवजे येथे राहणीमान, संस्कृती आणि व्यावसायिकता यांसदर्भातील अभ्यास दौऱ्यासाठी आले आहेत. ‘येथील शाकाहारी व मांसाहारी जेवणात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमुळे येथील जेवणाची चवच न्यारी वाटते. ऑस्ट्रेलियातील फास्ट फूडपेक्षा इथले खाद्यपदार्थ पचनासही हलके आहेत. आम्हाला कुणालाच इथल्या जेवणाचा त्रास झालेला नाही,’ असे जेम्स आयर्स या विद्यार्थ्याने सांगितले. 

ऑस्ट्रेलियाविषयी बोलताना जेम्स म्हणाला, ‘आमचा देश इंग्रजांनी वसविला आहे. जगातील सर्व प्रकारचे लोक या देशात आहेत. इंग्रजांच्या संस्कृतीत या देशाचा जन्म झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची वेगळी अशी खाद्यसंस्कृती देशाच्या कुठल्याच भागात पाहायला मिळत नाही. उलट कोकणातील जेवणातील खाद्यपदार्थ ‘हेल्दी’ असल्याची जाणीव होते. इथले चिकन, माशांचे तिकले, फ्राय केलेले मासे चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात. कोकणातील जेवण काट्या-चमच्याने जेवण्यापेक्षा हाताने जेवतानाचा आनंद वेगळाच आहे. कोकणसारखे मांसाहारी पदार्थ ऑस्ट्रेलियात मिळत नाहीत. म्हणूनच चवीमुळे इथल्या खाद्यसंस्कृतीचे वेगळेपण वाटते.’ 

जेम्स आयर्स‘कोकणातले जीवन शांत व सुखदायक वाटते. इथल्या वातावरणात आम्ही खूप एन्जॉय करतोय. रात्री थंडी, दुपारची उष्णता याचा अनुभव घेत आहोत; मात्र आताची उष्णता पाहून कदाचित उन्हाळ्यात आम्ही एवढं एन्जॉय करू शकलो नसतो,’ असे मत त्याने व्यक्त केले. 

येथील शेतीविषयी जेम्स म्हणाला, ‘३०-४० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात व्यक्तिगत शेती केली जात होती; मात्र नंतर सर्वांनी कंपनीला शेते विकली. त्यामुळे आमच्याकडे मोठ्या  प्रमाणात व्यावसायिक शेती होते. तसेच आमच्या शेतातले तंत्रज्ञानही प्रगत आहे. इथे शेती-तंत्रज्ञानात नुकतीच सुरुवात झाली आहे, असे वाटते आहे. ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात गहू व बार्लीचे उत्पादन होते. उत्तर ऑस्ट्रेलियात पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात फळे पिकवितात. तसेच बटाटा, टोमॅटो, रताळे, भोपळा ही पिकेही हंगामात होतात. ऑस्ट्रेलियातील व येथील बटाटा, टोमॅटोमध्ये चवीत फरक जाणवत नाही; मात्र ऑस्ट्रेलियात इतर देशांतून आयात केलेला बटाटा चवीला वेगळा लागतो.’

कोकण आणि ऑस्ट्रेलिया यांची व्यावसायिक तुलना करताना जेम्सने सांगितले, ‘येथील इतर व्यवसायही लहान स्वरूपाचे वाटतात. ऑस्ट्रेलियात प्रगत शेती आहेच; पण पोल्ट्री फार्मही खूप मोठ्या स्वरूपाचे आहेत. दळणवळणही सुधारलेले आहे. ऑस्ट्रेलियातील खेडी इथल्या खेड्यांसारखीच आहेत. अभ्यास दौऱ्याबरोबरच इथल्या भौगोलिक, व्यावसायिक स्थितीबद्दलही आम्हाला निरीक्षण करायला मिळाले. भात मळणीचे मशीन, वीटभट्ट्या, बायोगॅस असे वेगळे विषय अभ्यासता आले.’ 

‘इथल्या लोकांनी केलेले स्वागतही खूप मोठे होते. कोकण दौऱ्यातील अभ्यासक्रमात बरेच काही शिकता आले,’ असेही जेम्सने आवर्जून नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZRFBK
Similar Posts
सिंधुदुर्गात फेरफटका - भाग दोन ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या उत्तरेकडचा भाग पाहिला. या भागात माहिती घेऊ या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिण भागाची.
दक्षिण कोकणची रंगभूमी - दशावतारी नाट्य पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा हा लेख!
शेवटचे स्टेशन कुडाळ!! आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो तेव्हा अनेक स्टेशनांची अनाउन्समेंट ऐकू येते आणि शेवटी आपले स्टेशन येते. अनेक स्टेशन्स पालथी घातल्यावर आपले मुक्कामी स्टेशन येते. इथे विसावा असतो. कल्याण सोडून असा विसावा कुडाळमध्ये घ्यावा असे मला वारंवार वाटत आहे.
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language